HW News Marathi
देश / विदेश

आयसीयूमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

बरेली | उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमधील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीला एका किड्याने दंश केल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर व्हेंटिलेटवर ठेवल्यानंतर या मुलीची प्रकृती सुधारली होती.

या मुलीवर उपचार सुरु असतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. एका हिंदी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्यानंतर या मुलीने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मुलीच्या तक्रारीनंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तपस सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपारा येथे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

News Desk

अयोध्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात

News Desk

तेलंगणा विधानसभेच्या मतदानाला सुरुवात

News Desk