मुंबई | देशांतर्गत प्रवासी विमानसेवा येत्या २५ मेपासून सुरू करण्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केली. देशात व्यावसायिक विमान उड्डाणे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद होती. या पार्श्वभूमीव पुरींनी आज (२१ मे) पत्रकार परिषद घेऊन पुढील तीन महिन्यांच्या काळासाठी विमान प्रवासाची नियमावली जाहीर केली आहे.
For operation from Metro to Metro cities 1/3rd capacity of approved summer schedule 2020, which is more than 33.33%. For operation from Metro to Non-metro cities& vice-versa, where weekly departures are greater than 100, 1/3rd capacity of approved summer schedule 2020: HS Puri https://t.co/RgeIxUjPjt pic.twitter.com/crYUydFY9N
— ANI (@ANI) May 21, 2020
केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा परवानगी दिली असून विमानतळांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आहे. टप्प्याटप्प्याने सेवा सुरळीत करणार आहे. जे प्रवासी आरोग्याच्या कारणामुळे प्रवास करू शकत नसतील ते कोणत्याही शुल्काविना त्यांचे तिकीट पुढे ढकलू शकातात, असे हरदीप सिंह पुरींनी सांगितले.
A self-declaration or Aarogya Setu App status on a compatible device would be obtained to ensure that a passenger is free of #COVID19 symptoms. Passenger with red status on Aarogya Setu App will not be allowed to travel: Civil Aviation Minister Hardeep Singh Puri https://t.co/RgeIxUjPjt
— ANI (@ANI) May 21, 2020
प्रवाशांनी आरोग्य सेतू अपवर डाऊनलोड केलेले असणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोव्हिड-१९ची लक्षणे दिसत नसल्याबाबत स्वयंघोषित केलेले असावे. आरोग्य सेतू अपवर रेड स्टेटस असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही. एसओपी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या, ज्यात तिकीट दरांचाही समावेश होता.
असे आहे विमानाचे वर्गीकरण
यानुसार मुंबई ते दिल्ली विमान तिकीट किमान ३५०० ते कमाल १० हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. विमान मार्गांचे वर्गीकरण ७ प्रकारांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये ०-३० मिनिट, ३०-६० मिनिट, ६०-९० मिनिट, ९०-१२० मिनिट, १२०-१५० मिनिट, १५०-१८० मिनिट आणि १८० ते २१० मिनिट असे हे वर्गीकरण आहे.
विमानप्रवासासाठी ‘या’ आहेत आवश्यक अटी व शर्थी
- प्रत्येक प्रवाशाने मास्क घालणे आणि सॅनिटायझरसोबत बाळगणे अनिवार्य.
- विमानात एक तृतीयांश म्हणजेच क्षमेतच्या एकूण ३३ टक्के प्रवाशांनाच परवानगी असेल.
- प्रवासात जेवण मिळणार नाही. पाण्याच्या बाटल्या सीटबाजूला ठेवलेल्या असतील.
- प्रवाशांनी आरोग्य सेतू अपवर डाऊनलोड केलेले असणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोव्हिड-१९ची लक्षणे दिसत नसल्याबाबत स्वयंघोषित केलेले असावे. आरोग्य सेतू अपवर रेड स्टेटस असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही.
- केबिन क्रूने सुरक्षात्मक उपाययोजना केलेल्या असाव्यात.
- फक्त एका चेक इन बॅगला परवानगी.
- प्रवाशांनी वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे.
- विमान भाडं नियंत्रणात आणण्यासाठी एका विशिष्ट मॉडेलचा वापर करावा.
- देशातील हवाई मार्गांची प्रवासास लागणाऱ्या वेळेनुसार सात भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यानुसार त्यांचा दर ठरवण्यात येईल.
- हे नियम तीन महिने म्हणजेच 24 ऑगस्टपर्यंत लागू असतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.