भोपाळ | मध्य प्रदेशमध्य कमलनाथ सरकारची आज (१६ मार्च) विधानसभेत बहुमत चाचणी होई शकली नाही. यामुळे आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेत येत्या ४८ तासांत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.
A petition has been filed in the Supreme Court by Bharatiya Janata Party seeking floor test in Madhya Pradesh Assembly pic.twitter.com/ZE8Fth55dJ
— ANI (@ANI) March 16, 2020
कमलनाथ सरकारला आज मध्य प्रदेशाच्या विधानसभेत राज्यपाल लालजी टंडन यांनी भाषण दिल्यानंतर लगेचच विधानसभा तहकूब करण्यात आली. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावाशिवायच विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवराजसिंग चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत येत्या ४८ तासात सुनावणी करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेला सोडचिठ्ठ देत ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शिंदेंसोबत काँग्रेसचे २२ आमदारांनी पक्षाकडे राजीनामा दिला होता. यानंतर कमलनाथ सरकार अल्पमतात आले. मात्र, कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र लिहून ही चाचणी घेतली पुढे ढकलण्याची विनंती केली. काही आमदारांना बंदी करून ठेवण्यात आले आहे. तरी जोपर्यंत सर्व आमदारांना सोडत नाही तोपर्यंत ही चाचणी करू नये असे या पत्रात लिहिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.