HW News Marathi
देश / विदेश

अण्वस्त्रबंदीच्या दिशेने उत्तर कोरियाचे एक पाऊल पुढे

प्योंगयाँग | अण्वस्त्रबंदीच्या दिशेने पाऊल पुढे टाकताना उत्तर कोरियाकडून गुरुवारी पंग्गी-री हे अण्वस्त्रचाचणी केंद्र स्फोटांनी उद्धवस्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान काही निवडक असे 20 आंतरराष्ट्रीय पत्रकार उपस्थित होते.

दक्षिण कोरिया सोबत सुरू असलेली शांतता चर्चा आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची नियोजित बैठकीमुळे हुकूमशहा किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

उत्तर कोरियाच्या उत्तर भागातील पर्वत रांगांमध्ये पंग्गी-री हे अणुचाचणी केंद्र होते. इथल्या पर्वतांच्या खाली असलेले दोन शक्तीशाली टनेल सहा स्फोटांनी उद्धवस्त करण्यात आली. या केंद्रात या आधी ६ अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या. अनेक देशांनी हुकूमशहा किम जोंग उन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रसिद्ध लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

swarit

Ayodhya Verdict : ५ सदस्यीय खंडपीठात ३ मराठी न्यायाधीशांचा समावेश

News Desk

BYJU कडून नीरज चोप्राला 2 कोटींची भेट!

News Desk