नवी दिल्ली। राजस्थानमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राजस्थानचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नव्या मंत्रिमंडळातील १५ आमदार आज (२१ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्रिमंडळातील १५ आमदारापैकी ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.
राज्यस्थानच्या नव्या मंत्रिमंडळात ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे. राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्री म्हणून राजस्थानच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. तर हेमा राम चौधरी आणि रमेश मीणा यांना सचिन पायलट यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. बृजेंद्र ओला आणि मुरारी मीणा यांना सचिन पायलट जवळच्या नेत्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. राजेंद्र गूढा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.
A total of 15 Rajasthan leaders, including 11 cabinet ministers, to take oath as part of the state cabinet reshuffle pic.twitter.com/1crm8Rzfje
— ANI (@ANI) November 20, 2021
राज्यस्थानमध्ये शुक्रवारी गोविंद सिंह दोतास्रा, हरीष चौधरी आणि रघु शर्मा यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामे पाठविले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शनिवारी (२० नोव्हेंबर) महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.