HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद

कश्मीर | पठाणकोट महामार्गाजवळ असणाऱ्या सुंजवा लष्करी कॅम्पवर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्लायामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता दर्शविली जात आहे. अधिकारी राहत असलेल्या परिसरात दहशतवाद्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

या हल्यात ज्युनियर लष्करी अधिकारी मदन लाल चौधरी आणि त्यांच्या मुलीसह तीन जवान जखमी झाले होते. यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारा दरम्यान लष्करी अधिकारी चौधरी शहीद झाले. तर जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. काही तास दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता.

या गोळीबारीत एक दहशवादी ठार झाला असून लष्कराकडून ड्रोनच्या सह्याने परिसराची पाहणी सुरू आहे. संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला आहे. या परिसराजवळील ५०० मीटर अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या कॅम्पमध्ये ३ ते ४ दहशतवादी लपले असल्याचा अंदाज आहे. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यमुना एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा मोठा स्फोट

swarit

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna

कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस बॉस जबाबदार नाही | सर्वोच्च न्यायालय

News Desk