HW News Marathi
देश / विदेश

भगवंत मान हे ‘आप’कडून पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार

नवी दिल्ली | देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आता या पाचही राज्यातील सर्व पक्ष एका पाठोपाठ एक त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. आता आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (१८ जानेवारी) घोषणा केली आहे. 

मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भगवंत मान हे भावूक झाले होते. यावेळी भगवंत मान म्हणाले, “मला लोकांनी विनोदी कलाकार म्हणून माझा चेहरा पाहून लोक हसायची. आणि माझ्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. मी मोठमोठ्या सभांना जातो, तेथील लोकांचा चेहरा पाहून मला रडतात. जणू ते मला बोलतात की, आम्हाला वाचवा. आमची मुले चुकीच्या संगतीमध्ये अडकली आहेत. माझ्या हातात सत्ता आली तर गरिबांचे जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने मी निर्णय घेईल.”

एसएमएमद्वारे भगवंत मान यांना ९३ टक्के मते – केजरीवाल

“पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा शोधण्यासाठी आम्ही वेगळ्या प्रक्रियेचा अवलंब केला होता. जसे इतर पक्ष सून-सुनेला मुख्यमंत्री पद देत आहेत. पंरतु, मी भगवंत मान यांना पंजाबचा चेहरा म्हणून घोषणा केली. आपने एसएमएस पाठवून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार उमेदवार निवड, असे आवाहन पंजाबमधील जनतेला केले होते. यात जनतेने मानच्या बाजुने ९३ टक्के लोकांनी त्यांचे नान घेतले असल्याची माहिती केजरीवालांनी चंदिगडमध्ये केले होते.”  

 भगवंत मान हे २०१७ मध्ये पंजाबमध्ये आपचे प्रमुख बनले असून आपकडून संसदेत निवडून गलेले पहिले एकमेव खासदार आहेत. मान हे संगरूरमधून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. राजकाणात एँन्ट्री करण्यापूर्वी ते एक प्रसिद्ध विनोदी कलाकार होते.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…” भाजपने शरद पवारांना डिवचले

News Desk

अखेर जीवघेणा ‘ब्ल्यू व्हेल’ नष्ट!

News Desk

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, लवकरच कळेल मध्यस्ती होणार की नाही?

Atul Chavan