नवी दिल्ली | “भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकदरम्यान त्या भागात साधारणतः ३०० मोबाईल अॅक्टिव्ह होते”, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. यावेळी जवळपास ३०० मोबाईल अॅक्टिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतरच भारतीय हवाई दलाने येथे बॉम्बफेक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
NTRO surveillance of Balakot JeM camp before strikes confirmed 300 active targets
Read @ANI story | https://t.co/tnITS9k6MQ pic.twitter.com/rzJgaLsFuZ
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2019
भारतीय हवाई दलाच्या १२ ‘मिराज २०००’ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर १००० किलोंचे बॉम्ब फेकले. यात जवळपास २५० ते ३०० दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आल्याचे म्हटले जात असले तरीही अद्याप भारत सरकारकडून याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारतीय हवाई दलाला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी मिळाल्यानंतर राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (एनटीआरओ) या तळांवर देखरेख ठेवायला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.