HW News Marathi
देश / विदेश

“पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध?”, राहुल गांधींनी जुना फोटो दाखवित केले सवाल

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींच्या काय संबंध?, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आणि अदानींचा जुने फोटो लोसभेत दाखविले उपस्थित केला आहे. यामुळे सत्ताधारी सभागृहात गोंधळ घातला. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू आहे. या अधिवेशनाचा आज (7 फेब्रुवारी) दिवशी लोकसभेत हिंडेनबर्गच्या अदानी समूहाच्या (Adani Group) अहवालावरून संसदेत गदारोळ सुरू आहे. सभागृहात अदानींच्या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावर भाषण करताना राहुल गांधी म्हणाले, “माझ्या भारत जोडो यात्रेदरम्यान मी  केरळ, तमिळनाडूपासून हिमाचलपर्यंत प्रत्येक राज्यात अदानींचेच नाव ऐकू येते होते. तरुण विचारयाचे की, आम्हालाही अदानींसारखे स्टार्टअप सुरू करायचे आहे. अदानी हे जो व्यवसाय हाता घेतात. तो यशस्वी होतो. अदानी 2014 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. मोदी दिल्लीत आल्यानंतर अदानी थेट दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचले”, असा आरोप त्यांनी केला आहे.

 

अग्निवीर ही योजना आरएसएस आणि केंद्रीय गृहखात्याच्या डोक्यातून आली

राहुल गांधींनी अदानींवर टीका करत थांबले नाही तर त्यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. अग्निवीर योजनेवर बोलताना राहुल गांधी सभागृहात म्हणाले, “भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकांनी माझ्याकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला काही युवक सांगितले की, आम्ही सकाळी 4 वाजता धावायाल जातो. खूप तयारी करतो. यापूर्वी आम्हाला सैन्यात 15 वर्षांची सर्विस मिळत होती. आता फक्त चार वर्षांची सर्विस देणे बंधनकारक झाली आहे. यानंतर आम्हाला काढून टाकणार, पेन्शन देखील मिळणार नाही. सैन्यातील काही माजी अधिकारी अग्निवीर केंद्र सरकारच्या योजनेवर खूश नाहीत. अग्निवीर ही योजना सैन्याकडून आलेली नाही तर ही योजना आरएसएस आणि केंद्रीय गृहखात्याच्या डोक्यातून आलेल्याचे माजी अधिकारी सांगतात. ही योजना सैन्यावर थोपलेली असून या अग्निवीर सैन्याला कमकुवत करणारी आहे. हजारो लोकांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देऊन, चार वर्षानंतर त्यांना समाजात सोडणार असून यामुळे बेरोजगारी आणि समाजात हिंसाचार वाढू शकतो, असेही निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.”

 

 

Related posts

योगी आदित्यची ताजवर खप्पा मर्जी

News Desk

नववर्षात भारताने केला आगळा वेगळा विक्रम

News Desk

विमान दुर्घटनेत पर्यटन मंत्री रबींद्र अधिकारीसह ५ जणांचा मृत्यू

News Desk