HW News Marathi
देश / विदेश

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, २० जणांचा मृत्यू

काबूल | अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये आत्मघातील हल्ला झाला. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षाही अधिक जण जखमी झाले आहेत. यात मृतांमध्ये १७ स्थानिक शीख आणि हिंदू अल्पसंख्याक नागरिकांचा समावेश आहे.

हा हल्ला होण्यापुर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी या परिसरातील एका रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. गनी यांच्या दौरा असल्यामुळे जलालाबादमध्ये मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठतील दुकाने बंद ठेवण्यात आली असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफगाणिस्तानातील आत्मघाती हल्याचा निषेध व्यक्त करत ट्विट केले आहे. अफगाणिस्तानच्या बहुसांस्कृतिक रचनेवरील हा हल्ला आहे. या हल्ल्यात जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे होतील, अशी मी प्रार्थना करतो. आफगाणिस्तानच्या दु:खद काळात भारत त्यांच्यासोबत आहे. असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे अलाहाबाद मध्ये दंगल

News Desk

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

News Desk

नीरव मोदीला पुन्हा एक मोठा दणका

News Desk