HW News Marathi
देश / विदेश

पिकनिकला गेलेल्या बसचा अपघात, १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

सूरत | पिकनिकवरून परतणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस गुजरातच्या सूरतहून शनिवारी (२३ डिसेंबर) संध्याकाळी सूरतहून परतताना महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत ही बस कोसळली. या अपघातात आतापर्यंत १० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर २० हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना डांगमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बसमध्ये पहिलीपासून आठवी इयत्तेपर्यंतचे जवळपास ६७ विद्यार्थी होते. सुरत जिल्ह्यातील अमरोली गावातील ट्युशन सेंटर गुरुकृपामध्ये शिक्षणारे विद्यार्थी शनिवारी पिकनिकसाठी गेले होते. ही मुले अमरोली आणि छापराभाठा भागातील होती. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर या मुलांना पुन्हा घरी नेले जाते होते. सायंकाळी ६ वाजता डांगच्या महाल-बर्डीपाडा घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस २०० फूट खोल दरीत कोसळली, या अपघातात १० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

केरळमध्ये साथीच्या रोगांमुळे नागरिक त्रस्त

Gauri Tilekar

कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने रुपया पुन्हा घसरला

Gauri Tilekar