HW News Marathi
Covid-19

ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला आणि ७ कोरोना रुग्णांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.

रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळेच यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला आणि ऑक्सिजन अभावी सात जणांचा मृत्यू झाला आहे.

नारयानगुडा पोलिसांनी देखील रस्ता चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात १४ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

निलेश लंकेंचा थेट कोविड सेंटरमध्ये मुक्काम! रुग्णसेवेचा अहोरात्र सपाटा सुरुच

News Desk

कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरु होणार नाही!

News Desk