HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर

नवी दिल्ली| केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत आंदोलन सुरु होते. या दरम्यान, दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारीला धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. दीप सिद्धूला तीस-तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.

दीप सिद्धूला त्याचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर तो वापरणार असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाऱ्याकडे करण्यास सांगितली आहे. या फोनचं लोकेशन २४ तास ऑन ठेवण्याबरोबर फोन स्विच ऑफ करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेला आपलं लोकेशन सांगण्याची अट ठेवली आहे.

 

८ एप्रिलला झालेल्या सुनावणीत आरोपी दीप सिदधूने स्वत: निर्दोष असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. तसेच जामीन देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात मला फसवलं जात असल्याचा आरोप केला होता. तर सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध करत दीप सिद्धू मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, केंद्राच्या या ३ कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार झाला होता. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यानंतर दीप सिद्धूला अटक केली होती. २३ फेब्रुवारीला त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आता कायद्यात रुपांतर

News Desk

भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

News Desk

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar