मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याच्या सहकाऱ्यांनासोबत कार्यक्रमासाठी कुवेतमध्ये गेले होते. विमानतळावर अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. अदनानच्या टीमला भारतीय कुत्रे म्हणून हिणवल्याचा घृणास्पद प्रकार घडला होता.
अदनान सामी आणि त्याचे सहकारी रविवारी रात्री हे सर्व जण विमानतळावर उतरले. तेव्हा कुवेतमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना ‘इंडियन डॉग्ज’ म्हणजे भारतीय कुत्रे म्हणून चिडवले. अदनान सामीने ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.
@indembkwt We came 2 ur city wt luv & our Indian brethren embraced us with it. U gave no support. Kuwaiti airport immigration mistreated my staff 4 no reason & called thm ‘Indian Dogs’! Wn u wr contacted u did nothing!! How dare d Kuwaitis behave like this with arrogance?! pic.twitter.com/9OPfuPiTW1
— Adnan Sami (@AdnanSamiLive) May 6, 2018
‘आम्ही तुमच्या शहरात प्रेम घेऊन आलो होतो. आमच्या भारतीयांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, मात्र तुम्ही कोणताही पाठिंबा दिला नाहीत. कुवेत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विनाकारण माझ्या स्टाफला तुच्छ लेखले आणि भारतीय कुत्रे म्हणून डिवचले. भारतीया दूतावासाशी संपर्क करुनही काही फायदा झाला नाही. कुवेतींची इतक्या उद्धटपणे वागण्याची हिंमतच कशी झाली?’ असा संताप अदनानने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
Thank you so much for your concern my dear. @SushmaSwaraj is a lady full of heart & she is in touch with me & is looking after our people.. I’m so proud that she is our foreign minister & looks after us all over the world. https://t.co/2KjCIyRG6f
— Adnan Sami (@AdnanSamiLive) May 6, 2018
स्थानिक भारतीय दूतावासाशी संपर्क साधूनही काहीही मदत न मिळाल्याचा दावा अदनानने केला आहे. अदनानचे ट्विट पाहिल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अदनानच्या तक्रारीची दखल घेत आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यानंतर काही वेळातच अदनानने आपल्याला मदत मिळाल्याचे सांगत स्वराज यांचे आभार मानले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post