HW News Marathi
Covid-19

सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव, न्यायाधीशांनी निवडला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय

नवी दिल्ली | काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने सर्वाेच्च न्यायालयालाही विळखा घातला आहे. न्यायालयातील अनेक कर्मचाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी ‘वर्क फ्राॅम हाेम’चा पर्याय निवडून घरूनच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ९० पैकी ४४ कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी घरातूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीचा पर्याय निवडला आहे.

न्यायाधीशांनी वर्क फ्राॅम हाेमचा पर्याय निवडला असून न्यायालयाच्या कामकाजावर काेणताही परिणाम हाेणार नाही असे सांगितले जात आहे. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या १६०० लिंक न्यायालयाकडे उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून १६ खंडपीठांचे काम सुरू आहे. इलेक्ट्राॅनिक स्वरूपात फाइल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे फाइल्स प्रत्यक्ष हलविण्याची गरज नाही, असे न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधीशांनाही काेराेना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज आता २३ एप्रिलपर्यंत व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे हाेणार आहे. चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी साेमवारी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यांना त्यांच्या निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे सावट, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार?

News Desk

गरीब, कष्टकरी व मजूरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार

News Desk

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk