HW News Marathi
देश / विदेश

#ArunJaitley : मी अत्यंत जवळचा मित्र गमावला, मोदींकडून भावुक श्रद्धांजली

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज (२४ ऑगस्ट) निधन झाले आहे. जेटलींवर ९ ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. जेटलींना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. थोड्याच वेळापूर्वी अरुण जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एम्सकडून त्यांचे १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

“मी अत्यंत जवळचा मित्र गमविला आहे. अरुण जेटली यांची कमतरता सदैव जाणवत राहिल,” असल्याचे भावनी ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. मोदींनी पुढे असे देखील म्हटले की, जेटलींना त्यांना प्रत्येक विषयाचे ज्ञान होते. मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचा दौरा आटोपून ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचले आहेत. जेटील यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मोदींनी ट्वीटवरून शोक व्यक्त केला. मोदींनी जेटली यांच्या कुंटुंबियांशी फोनवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित हैदराबाद दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणामुळे १७ व्या लोकसभा निवडणूक देखील लढविली नव्हती. “नव्या सरकारमध्ये आपल्याला कुठलीही जबाबदारी देऊ नये”, अरुण जेटली यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून अशी विनंती केली होती.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे!”

News Desk

बिहारचे राज्यपाल कोविंद एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार

News Desk

कर्नाटकमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजले!

News Desk