HW News Marathi
देश / विदेश

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली | देशातील एक अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ नेता अशी ओळख असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (१७ मार्च) अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त देत शोक व्यक्त केला. गेले अनेक महिने पर्रीकर हे कर्करोगासारख्या आजाराला झुंज देत होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्राने आज म्हणजेच १८ मार्चला राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह देशातील अन्य राज्यांच्या राजधानीत तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे.

मनोहर पर्रीकर यांचा अल्प परिचय

मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ साली म्हापसा येथे झाला. मडगावच्या लॉयल हायस्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथून धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आय.आय.टी. ची पदवी घेतलेले पर्रीकर हे पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आय.आय.टी तील वर्गमित्र आहेत. पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. १४ मार्च २०१७ रोजी मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नोव्हेंबर २०१४ साली, पर्रिकर यांना अरुण जेटलींऐवजी प्रतिरक्षा मंत्री म्हणून निवडण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-सौदी अरेबियामध्ये पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या

News Desk

अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना २१ व्यांदा ऑस्करमध्ये नामांकन

News Desk

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna