HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष ठरणार देशाचे पहिले लोकपाल ?

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी (१५ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली लोकपाल निवड समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत लोकपाल अध्यक्षासह अन्य ८ सदस्यांच्या नावांबाबत झालेल्या चर्चेनंतर न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांच्या नावाची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

लोकपाल निवड समिती

लोकपाल निवड समितीमध्ये लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई, ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी तसेच विशेष आमंत्रित करण्यात आलेले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या बैठकीत मात्र मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थित होते.

पिनाकी चंद्र घोष यांचा अल्प परिचय

पिनाकी चंद्र घोष हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) सदस्य आहेत. १९९७ साली ते कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले तर डिसेंबर २०१२ मध्ये आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून घोष यांची नियुक्ती झाली. २०१७ साली ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Agusta Westland : सक्सेना ४ तर तलवार ७ दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत

News Desk

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार

News Desk

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे प्रफुल्ल पटेल यांनी ईडीच्या चौकशीला मारली दांडी

News Desk