उज्जैन | सुप्रीम कोर्टाने दोन दिवसापूर्वी दिवाळीत फटाके फोडण्यासंबंधीत आणि फटाके विक्रीसाठी महत्वाचा निर्णय दिला होता. या आदेशानुसार ८ ते १० असे २ तास फटाके फोडू शकतो असा निर्णय दिला आहे, मात्र मध्यप्रदेशचे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. हिंदू सणांच्या परंपरेत कोणालाही ढवळाढवळ करू देणार अशी तीव्र प्रतीक्रिया मालवीय यांनी आपल्या ट्विटद्वारा केली आहे.
में अपनी दीवाली अपने परम्परागत तरीके से मनाऊंगा और रात में लक्ष्मी पूजन के बाद 10 बजे के बाद ही पटाखे जलाऊंगा । हमारी हिन्दू परंपरा में किसी की भी दखलंदाजी में हरगिज बर्दाश्त नही कर सकता । मेरी धार्मिक परम्पराओं के लिए यदि मुझे जेल भी जाना पड़े तो में खुशी खुशी जेल भी जाऊंगा । pic.twitter.com/Vvmyqmyxln
— Chintamani Malviya (@drchintamani) October 23, 2018
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार सण साजरा करण्याची वेळ नसते म्हणून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री 10 नंतर मी फटाके फोडणार त्यासाठी मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल , मी आंनदाने गुरुंगात जायला तयार आहे’, असे ट्विट करत त्यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिले आहे.
Our religions traditions and festivals are followed by Hindu calendar. I will burst crackers only when I finish puja, we can't set time limits on festivals, such restrictions were not even in Mughal times. Its unacceptable: BJP MP Chintamani Malviya on SC order on #firecrackers pic.twitter.com/AEDkKFg0YD
— ANI (@ANI) October 23, 2018
दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आले असून , दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळ देखील ठरवून देण्यात आली आहे. संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.