नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. दुआ यांनी आज (४ डिसेंबर) वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दुआ यांच्यावर उद्या (५ डिसेंबर) दुपारी १२ वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांची कन्या मल्लिका दुआ यांनी दिली आहे. मल्लिका दुआ यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची दु : खद बातमी दिली. दुआ यांच्या निधनानंतर राजकीय नेते मंडळींनी ट्वीट करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या आकस्मिक निधनाचे दु:खद आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवारकडून सहवेदना, असे लिहत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी फेसबुकवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
“विनोद दुआ आता नाही…मी माझा एक मित्र आणि मार्गदर्शक गमावला,” एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे मॅनेजिंग एडिटर सूजित नायर यांनी ट्वीट केले आहे. विनोद दुआ यांनी २०१८ मध्ये HW न्यूज नेटवर्कमध्ये त्यांचा नवी सफर सुरू केला होता. HW न्यूज नेटवर्कसोबत विनोद दुआ यांनी ‘द विनोद दुआ शो’ जवळपास ४६४ शो केले आहेत.
Vinod Dua no more… Lost a friend and a mentor
— Sujit Nair (@sujitnair90) December 4, 2021
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील विनोद दुआ यांच्या निधनानंतर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “विनोद दुआ यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. विनोदजींनी भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. दुआ यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो,” असे केजरीवाल म्हणाले.
“ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या निधनाची बातमी कळताच अत्यंत दु:ख झाले. दुआ यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दुआ यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना माझ्या संहवेदना”, असे ट्वीट माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केले आहे.
Deeply saddened to learn about the demise of senior journalist Shri Vinod Dua ji. His passing away has left a huge void in the field of journalism. May the departed soul find peace.
My condolences to his family and loved ones.
— Sachin Pilot (@SachinPilot) December 4, 2021
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संहवेदना. ओम शांती, असे ट्वीट केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे.
Distressed to learn about the demise of veteran journalist Sh Vinod Dua Ji. My sincerest condolences to his family & admirers. Om Shanti.
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) December 4, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.