कोलंबो | श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तब्बल ८ ठिकाणी (२१ एप्रिल) सकाळी साखळी बॉम्बस्फोट झाला आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर ३ बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाले आहेत. या स्फोटात जवळपास १८५ जणांचा मृत्यू झाला असून यात ३५ पर्यटक असल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून जखमींच्या अकड्यात वाढ होण्याशी शक्यता वर्तविली जाते आहे.
AFP News Agency quoting police: Curfew imposed immediately 'until further notice'. #SriLankaBlasts https://t.co/gc88ezuPvN
— ANI (@ANI) April 21, 2019
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. श्रीलंकेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
PM Modi: Strongly condemn the horrific blasts in Sri Lanka. There is no place for such barbarism in our region. India stands in solidarity with the people of Sri Lanka. My thoughts are with the bereaved families and prayers with the injured. (file pic) pic.twitter.com/YBICcCn3iE
— ANI (@ANI) April 21, 2019
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून हिंदुस्थान या प्रसंगात श्रीलंकेच्या नागरिकांसोबत खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही देखील दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असून या हल्ल्यातील जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थन करत असल्याची प्रतिक्रिया पतंप्रधानांनी दिली आहे.
Minister of External Affairs, Sushma Swaraj: Indians in distress may please contact Indian High Commission in Colombo. We will provide you all assistance. @IndiainSL Our helpline numbers are: +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789. https://t.co/yS7RF2IIPC
— ANI (@ANI) April 21, 2019
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे भारतीय देखील चिंतेत आहेत. श्रीलंकेतील कोलंबो शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिक, तसेच भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. या स्फोटात कोणत्याही भारतीयाला दुखापत झाली नाही. परंतु या पार्श्वभूमीवर आपण कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.