HW News Marathi
देश / विदेश

मुस्लिम तरुणाला केलेल्या मारहाण प्रकरणी गौतम गंभीर भडकला

नवी दिल्ली | गुरुग्राममध्ये धर्माचे ठेकेदार समजणारी मंडळींनी एका २५ वर्षीय मुस्लिम तरुणाला काही अज्ञातांनी जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना घडली. मोहम्मद बरकत आलम असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील सदर बाजार परिसरात काही अज्ञात तरुणांनी त्याला घेरले आणि घातलेल्या पारंपारिक टोपीवर आक्षेप घेतला.

या अज्ञात लोक मला धमकावत परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही असे सांगू लागले. त्यांनी माझी टोपी काढली आणि श्रीमुखात लगावली. यावेळी त्यांनी मला भारत “माता की जय” अशी घोषणा देण्यासही सांगितले’, अशी माहिती आलमने दिली आहे. तसेच तो पुढे म्हणला, अज्ञातांनी सांगितल्याप्रमाणे भारत माता की जय घोषणा दिल्यानंतर त्यांनी “जय श्रीराम” बोलण्यास सांगितले. परंतु त्यासाठी मी नकार दिला असता त्यांनी मला मारहाण केली.

सदर बाजार येथील मशिदीतून नमाज पठण करुन परतत असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आलमची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदतदेखील घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुस्लीम युवकाची टोपी उतरवून त्याला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितले गेले. ही प्रकार अत्यंत निंदनीय असून गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. एका बाजूनला जावेद अख्तर ‘ओ पालन हारे निर्गुण और न्यारे’सारखे आणि राकेश मेहरा ‘अर्जियां’सारखे गाणे लिहितात, अशी टीका भाजपचे दिल्लीचे नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk

#Article370Abolished LIVE : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कलम ३७० अंशत: रद्द

News Desk

ममता बॅनर्जी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

News Desk