नवी दिल्ली | ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात दुबईतून उद्योजक राजीव सक्सेना आणि कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवार दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय तपास संस्थेने दुबईतील या दलालांना यांना अटक करून भारतात प्रत्यार्पण केले आहे. या आधी या प्रकरणी ख्रिस्तियन मिशेल याला भारतात आणले असून यानंतर ही सर्वात भारताची ही मोठी कारवाई मानली जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मिशेल याचे भारतात प्रत्यार्पण झाले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
Corporate Lobbyist Deepak Talwar has been sent to 7 days of ED remand by Delhi's Patiala House Court. #AgustaWestland pic.twitter.com/46ELqJ9oR4
— ANI (@ANI) January 31, 2019
भारतात आणल्यानंतर या राजीव सक्सेना यांना आज (३१ जानेवारी) पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सक्सेनाला चार दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले आहे. ईडीने न्यायालयाकडे आठ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. तसेच दीपक तलवारला सात दिवसाच्या ईडीच्या कोठडीत पाठविले आहे.
Dubai-based businessman Rajiv Saxena, a co-accused in Agusta-Westland VVIP chopper case has been sent to 4 days of ED remand by Delhi's Patiala House Court. pic.twitter.com/WgOYUjtuOq
— ANI (@ANI) January 31, 2019
हे दोघेही दलाल ख्रिस्तियन मिशेल अगदी जवळचे सहकारी आहेत. या दोघांना दुबईतून ३० जानेवारीला विशेष विमानाने मध्यरात्री १.३० वाजता भारतात आणले. यानंतर आज पहाटे ४ वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) च्या ताब्यात देण्यात आल्यानंतर अटक करण्यात आले. त्यानंतर या दोघांना पटियाला न्यायालयात हजर केले.
#WATCH AgustaWestland accused Rajiv Saxena & corporate lobbyist Deepak Talwar who were extradited from UAE last night pic.twitter.com/TUfbK8MwsK
— ANI (@ANI) January 31, 2019
मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, सक्सेना हा अकाऊंटंट असून त्याच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावले होते. त्याची मनी लाँडरिंग प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जात आहे. तर तलवार याच्यावर गुन्हेगारी कट रचणे तसेच अवैधरित्या निधीचे हस्तांतरण केल्याचा आरोप आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. तर याआधी २०१७ मध्ये सक्सेना याची पत्नी शिवानी सक्सेना हिला चेन्नई विमानतळावर अटक केली होती. तिला जामिनावर सोडण्यात आले होते. राजीव सक्सेना आणि त्याच्या पत्नीवर मनी लाँडरिंगचा आरोप आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.