मुंबई | ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक ख्रिस्तियन मिशेलला दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ व कंत्राटासाठी कंपनीकडून सुमारे २२५ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आरोप ख्रिस्तियनवर लावण्यात आला आहे.
Christian Michel, the alleged middleman in the Rs 3600 crore AgustaWestland helicopter deal, arrived in New Delhi after being extradited to India from Dubai
Read @ANI Story | https://t.co/NZiazPfzWu pic.twitter.com/eQSJufma07
— ANI Digital (@ani_digital) December 4, 2018
नेमके काय आहे ऑगस्त घोटाळा
भारतीय हवाई दलाने २०१० मध्ये इटलीच्या ऑगस्ता या कंपनीकडून ३ हजार ६०० कोटी रुपयात १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार केला होता. हा व्यवहार ज्यावेळी झाला होता, त्यावेळी केंद्रात यूपीए सरकार सत्तेत होते तर मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान होते. तर हवाई दलाचे प्रमुख एस.पी. त्यागी होते.
या व्यवहारासाठी कमीशनरुपी १० टक्के म्हणजे सुमारे ३५० कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असे सांगण्यात येते. या व्यवहारात लाचखोरी झाल्याचे २०१२ मध्येसमोर आले. घोटाळ्याच्या गदारोळानंतर २०१३ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते
इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात १२५ कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्ता वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
टलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आले आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आले नसले तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.