HW News Marathi
देश / विदेश

एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन, देशासह जगभरातील विमानउड्डाण सेवा ठप्प

नवी दिल्ली | एअर इंडियाला एका अत्यंत मोठ्या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एअर इंडियाचा सीता (SITA) सर्व्हर शनिवार (२६ एप्रिल) पहाटे ३.३० वाजल्यापासून डाऊन आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे एअर इंडियाची देशासह जगभरातील विमानउड्डाण सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

“सीता (SITA) सर्व्हर डाऊन आहे. त्याचा परिणाम विमानउड्डाण सेवेवर झाला आहे. आमचे तंत्रज्ञ यावर काम करत आहेत. लवकरच सर्व्हर व्यवस्थित सुरु होईल”, असे म्हणत झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून खेद देखील व्यक्त करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजौरीतील जवानांसोबत साजरी दिवाळी

swarit

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

News Desk

शशी थरुर यांनी दिले डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर

News Desk