नवी दिल्ली | एअर इंडियाचा सीता (SITA) पुन्हा सुरळीतपणे सर्व्हर सुरु झाला असून एअर इंडियाची सेवा पूर्वपदावर आली असल्याची माहिती एअर इंडियाचे संचालक अश्वानी लोहानी यांनी दिली आहे. एअर इंडियाचा सीता सर्व्हर शनिवार (२६ एप्रिल) पहाटे ३.३० वाजल्यापासून डाऊन होता. त्यामुळे एअर इंडियाची देशासह जगभरातील विमानउड्डाण सेवा पूर्णपणे ठप्प होती. दरम्यान, आता तब्बल ५ तासांनंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरळीतपणे सुरु झाला आहे.
Ashwani Lohani, CMD Air India: B/w 3:30 to 4:30 am today, passenger services system of Air India that is run by SITA was taken for maintenance & after that it remained down till 8:45 am, it has just come back. System restored. During the day we will see consequential delays pic.twitter.com/nyUUHJcSaa
— ANI (@ANI) April 27, 2019
CMD Air India Ashwani Lohani says, "Air India System restored". Air India flights were affected since airline's SITA server was down all over India & overseas since 3:30 am. https://t.co/sETwuB489Z
— ANI (@ANI) April 27, 2019
एअर इंडियाला या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले आहे. यामुळे प्रवाशांचा देखील मोठा खोळंबा झाला. थोड्याच वेळापूर्वी एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला होता. “सीता (SITA) सर्व्हर डाऊन आहे. त्याचा परिणाम विमानउड्डाण सेवेवर झाला आहे. आमचे तंत्रज्ञ यावर काम करत आहेत. लवकरच सर्व्हर व्यवस्थित सुरु होईल”, असे म्हणत झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून खेद व्यक्त करण्यात आला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.