HW News Marathi
देश / विदेश

चेन्नई विमानतळात प्रवाशाच्या बॅगेत सापडला चक्क बिबट्याचा बछडा

तामिळनाडू | चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेतून चक्क बिबट्याचा बछडा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. तर चेन्नईतील अन्ना झुऑलॉजिकल पार्कमध्ये या बछडा सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चेन्नई विमानतळावर असलेला एक प्रवासी सुरक्षा यंत्रणांची नजर चूकवून बॅग घेऊन विमानतळाबाहेर जात होता. त्यावेळी प्रवाशाची हालचाल संशयास्पद वाटल्याने विमातळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला अडवून त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्या प्रवाशाच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात एका महिन्याच्या बिबट्याचा बछडा सापडला. या बछडा ताब्यात घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला दूध पाजले. त्यानंतर चेन्नईतील वाईल्डलाइफ सेंटरमध्ये बिबट्याच्या बछडाचे मेडिकल चेकअप करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : केंद्राने काश्मीरमधील ५ फुटीरतावादी नेत्यांचे संरक्षण काढून टाकले

News Desk

मोदी सरकार नाही तर भ्रष्ठाचाराला संरक्षण देणारं सरकार !

News Desk

अमेरिका-चीन व्यापार संघर्ष पुन्हा चिघळणार ?

Gauri Tilekar