HW News Marathi
देश / विदेश

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

नवी दिल्ली | केंद्र सरकारने आता देशातील अनेक बड्या नेत्यांना पुरविली जाणारी सीआरपीएफ जवानांकडून सुरक्षा व्यवस्था आता काढून घेतली आहे. या बड्या नेत्यांच्या यादीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशातील भाजप नेते संगीत सोम, भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.याचबरोबर उत्तर प्रदेशातील सत्ताधारी देखील सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यात सुरेश राणा, एलजेपीचे खासदार चिराग पासवान, माजी खासदार पप्पू यादव यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

सत्तेतील देखील मंत्र्यांना देण्यात येणारी सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था केंद्र गृहमंत्र्यालयाने काढली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या सुरक्षेतेसाठी असलेला ब्लॅक कॅट कमांडोचा ताफा कमी होणार आहे. अखिलेश यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी झाली आहे. तसेच, लालू प्रसाद यादव सध्या तुरुंगता असल्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्याची शक्यता

News Desk

माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही !

News Desk

काँग्रेसचा विचार गाव- खेड्यात पोहचवा ! | नाना पटोले

News Desk