HW News Marathi
देश / विदेश

‘धारावी’ला आरोग्यमंत्र्यांची भेट, क्वारंटाईनसह कोरोना रुग्णालयाची केली पाहणी

मुंबई | मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे ७ पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर याभागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (७ एप्रिल) संध्याकाळी धारावी परिसराला भेट दिली आहे. त्यांनी या भागात केवळ कोरोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई हॉस्पीटलला भेट देऊन व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

राजेश टोपेंनी धारावीमध्ये क्वारंटाईनची सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली आहे. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्याकरिता अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. धारावी भागात ५० खाटांचे साई हॉस्पीटल केवळ कोरोना उपचारासाठी घोषीत केले असून तेथे व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ३५० खाटांची अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याभागात ३५०० जणांना होम क्वारंटाईन सांगितले असून अनेक संस्था, व्यक्तींकडून याभागात धान्य, गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जात आहे.

धारावी पोलिस ठाण्यात आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली. संसर्गाचा धोका वाढू नये याकरिता गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच त्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. याभागात असलेल्या सार्वजनिक स्वचछतागृहांमध्ये सातत्याने निर्जंतुकरणाची प्रक्रिया राबवावी अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दिली देशव्यापी ‘बंद’ची हाक

News Desk

नीरव मोदी लंडनमध्ये, घोटाळ्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास दिला स्पष्ट नकार

News Desk

चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी, इस्रोच्या शोधाला नासाची पुष्टी

News Desk