HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये शहीद झालेला एक जवान अकोल्याचा

श्रीनगर : काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी सुरू असलेल्या चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य आले आहे, तर तीन जवान जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हौतात्म्य पत्करलेल्या दोघांपैकी एक जवान महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहे.

सुमेध वामन गवई असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून ते अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. या चकमकीमध्ये गवई यांच्यासह अन्य एका जवानाला वीरमरण आले, तर कॅप्टनसह तीन जवान जखमी झाले आहेत. तसेच लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार मारले आहे.

शोपियन जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात हीचकमक झाली. चकमकीनंतर लष्काराने परिसरात नाकाबंदी केली आहे. आणखी काही दहशतवादी येथे लपल्याचा अंदाज असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दुसरीकडे कुपवाडा परिसरातसुद्धा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑनलाईन सट्टा कंपनीच्या संचालकाला सायबर पोलिसांकडून अटक

News Desk

परमबीरसिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या E-Mailबाबत शहानिशा होणार

News Desk

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १४, आणखी २ जणांना कोरोनाची लागण

Arati More