HW News Marathi
देश / विदेश

अल कायदाच्या म्होरक्याची कश्मीरवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी

नवी दिल्ली | पाकिस्तनाची कुख्यात दहशतवादी संघटना अलकायदाचा म्होरक्या अल जवहिरीने एक व्हिडीओ जारी करून काश्मीरवरून भारताला पोकळ धमकी दिली आहे. या व्हिडिओमध्ये “डोन्ट फर्गेट कश्मीर” असे या संदेश देवून त्यावर मुसाचा फोटोही लावण्यात आला आहे. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा जवानांच्याविरोधात आक्रमक होण्याचा सल्ला देत दहशतवाद्यांनी एक रणनीती तयार केली पाहिजे, असे व्हिडिओत म्हणाले आहे.

काश्मीरमध्ये मुजाहिदीनने एकचित्त होऊन भारतीय लष्कर आणि सरकारवर निशाणा साधत त्यांना आत्मघाती हल्ल्यांसारखे घातपात घडवून आणण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराचा याचा मोठा भुर्दंड पडेल असेही जवहिरीने म्हटले आहे.

अल कायदा या अतिरेकी संघटनेचा भारतात अधिक विस्तार होत असून संघटनेने शेकडो सदस्य बनविले आहे. या संघटनेचे बहुतांश ठिकाणे अफगाणीस्तानात असून संघटनेनेच प्रमुख बांगला देशात आहेत. त्यांची ठिकाणे अफगाणिस्तानातील हेलमंद, कंधार, जाबुल, पख्तिया, गजनी आणि नूरिस्तान प्रांतात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे हेल्थ इमर्जन्सी लागू, ५ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद

News Desk

महाराष्ट्रातलं सरकार पाडायची हिंमत कोणाच्याही बापात नाहीये!

Arati More

दक्षिण आशियामध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी अल कायदा प्रयत्नशील

News Desk