HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातलं सरकार पाडायची हिंमत कोणाच्याही बापात नाहीये!

मुंबई | मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या ॲापरेशन लोटसमुळे अखेर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काल आपला राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासुन हे ॲापरेशन सुरू होतं. बहुमत चाचणी आधीच त्यांनी राजीनामा दिला. आता यावर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिली आहे.

राऊत काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यु संकल्पनेचं आम्ही स्वागत करतो. ते योग्य आवाहन आहे. डॉक्टर्स, नर्स अत्यावश्यक सेवा देत आहेत यांचे आभार मानायलाच हवेत. सैनिक युद्धावर लढतात तसे ते सर्व आपली जबाबदारी पार पाडत आहेत. विषाणूशी लढा देत आहेत. मी स्वतः सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे असलो तरी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून कामगिरी पार पाडत असतो. मी ‘सामना’त आहे आणि खासदार आहे. अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय संविधान जगासाठी आदर्श!; मंत्री धनंजय मुंडेंनी दिल्या संविधान दिनाच्या शुभेच्छा

News Desk

“मोदी आहेत आंबेडकरवादी…मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत मोदी?” आठवलेंची नवी कविता

News Desk

आता सागरी मार्गाने देशात शिरण्यासाठी दहशवाद्यांचे प्रशिक्षण सुरू !

News Desk