अमेरिका | जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत घोषणा केली. १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोनाची लस घेता येईल असं बायडेन यांनी सांगितलं आहे.
याआधी अमेरिकेने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला करोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी जो बायडेन यांनी १ मे ऐवजी १९ एप्रिलपासूनच १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस घेता येईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला, असं सांगितलं. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून १०० दिवस पूर्ण होईपर्यंत २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच १५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि ६२ दशलक्ष लोकांचं पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
दुसरीकडे, भारतातही वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. करोनाची लस १८ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता भारत सरकारही १८ वर्षांवरील लोकांना कोरोना लस देण्यासाठी परमानगी देणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
We crossed 150 million shots yesterday and are on our way to hitting the goal of 200 million shots by my 100th day in office. We are administering an average of 3 million shots per day over 20 million shots a week: United States President Joe Biden on #COVID19 vaccination pic.twitter.com/BRDp6BuUsR
— ANI (@ANI) April 6, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.