HW News Marathi
Covid-19

देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरू केले जाणार

नवी दिल्ली | कोरोना लशीसंदर्भात भारत आता सातत्याने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात आज आरोग्यमंत्रालायाने मोठा निर्णय घेतला असून, आता 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. या चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते. यानंतर आता सरकारने संपूर्ण देशातच हे ड्रय रन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्राय रनमध्ये काय होते?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार, ड्राय रनमध्ये राज्यांना आपली दोन शहरं निवडावी लागतील. या दोन शहरांत, लस शहरात पोहोचणे, रुग्णालयापर्यंत जाणे, लोकांना बोलावणे, यानंतर डोस देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे पालन, लसिकरण सुरू असल्याप्रमाणे केले जाईल. याच बरोबर सरकारने कोरोना लशीसंदर्भात तयार केलेल्या कोविन मोबाईल अॅपचेही ट्रायल होणार आहे. ड्राय रननरम्यान, ज्या लोकांना लस दिली जाणार असते, त्यांना SMS पाठवला जाईल. यानंतर अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत लसिकरणावर काम केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना लस दिली जाणार – सरकारने म्हटले आहे, की लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘प्लाझ्मा दान’करण्याचा निर्णय …

News Desk

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा

News Desk

कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

News Desk