HW News Marathi
देश / विदेश

अलोक वर्मांचा बदल्यांचा आदेश नागेश्वर राव यांनी केला रद्द

नवी दिल्ली | आलोक वर्मा यांना पुन्हा सीबीआयच्या संचालकपदावरून हटविण्याचा निर्णय गुरुवारी (१० जानेवारी) सिलेक्ट कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, त्याआधी म्हणजेच मंगळवारी (८ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयच्या संचालकपदी पुन्हा रुजू झाल्यानंतर अलोक वर्मा यांनी ५ सीबीआय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, आलोक वर्मा यांचा हा निर्णय नागेश्वर राव यांनी रद्द केला आहे.

सीबीआयच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेताच नागेश्वर राव यांनी पुन्हा एकदा अलोक वर्मा यांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (८ जानेवारी) सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केल्यानंतर आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआयच्या संचालकपदी रुजू झाले होते. मात्र, गुरुवारी (१० जानेवारी) सिलेक्ट कमिटीच्या बैठकीत आलोक वर्मा यांना सीबीआयच्या संचालक पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुचविलेले न्यायाधीश ए. के. सिकरी आणि विरोधी पक्ष नेते मलिक्कार्जुन खरगे यांचा या सिलेक्ट कमिटीमध्ये समावेश होता. सीबीआयच्या संचालकपदावरुन हटविण्यात आल्यानंतर एम. नागेश्वर राव यांची सीबीआयच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनीत कौरचा धमाका, भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात

News Desk

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

मशिदीत नमाज अदा करणे इस्लामचा अविभाज्य भाग?

News Desk