HW News Marathi
देश / विदेश

अमित शहाच्या मुलाविरोधातील केस प्रशांत भूषण लढणार

नवी दिल्लीः देशात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. अशात भाजपचे अध्यक्ष अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. दरम्यान, हे वृत्त निराधार असल्याचे सांगत संबंधित न्यूज पोर्टलविरूद्ध जय शहांकडून १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान शहा यांनी दावा दाखल केला असला तरी त्यांच्याविरोधात संबंधित न्यूज पोर्टलकडे सबळ पुरावे असल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी जय शहांच्याविरोधात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण मैदानात उतरले आहेत. जय शाह यांच्या कंपनीच्या वाढलेल्या उलाढालीवर लिहिण्यात आलेल्या लेखाचे लेखक, ‘द वायर’चे संपादक आणि मालक यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल बोलताना स्पष्ट केले होते. या प्रकरणात ‘द वायर’ची बाजू मांडण्याचे काम प्रशांत भूषण करणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मल्लिकार्जुन खरगे काँग्रसेचे नवे अध्यक्ष

Aprna

मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विधेयाकाला मंजूरी

News Desk

छत्तीगडमध्ये नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यात बेपत्ता असलेले १७ जवान शहीद

News Desk