HW Marathi
देश / विदेश

काश्मीरच्या त्रालमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्या झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन कायम आहे. आज (५ मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. त्राल परिसरात काही दशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्करांना मिळाली होती. यानंतर लष्कराने शोध मोहीत हाती घेतली होती.

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सोमवारी (४ मार्च) पहाटे ३ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबारी होती. या गोळीबारीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. ही गोळीबारी ६.३० वाजता थांबली. याआधी जम्मू-काश्मीरच्या हंडवाडा परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Related posts

अखेर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या

News Desk

सर न्यायाधीश मिश्रांची होणार उचलबांगडी ?

News Desk