अमृतसर | पंजाबमधील अमृतसरमध्ये चौडा बाजार येथे रावणदहन पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना दोन भरधाव वेगाने ट्रेन्सनी धडक दिल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल (शुक्रवारी) रात्री घडली. रामलीलेमध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेकजण रेल्वे रुळांवर उभे होते. याच अनेकांपैकी एक दलबीरही होता. या दुर्दैवी अपघातात ६१ हूनही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ जण जखमी झाले आहेत.
#Amritsar: Dalbir Singh (pic 1), who played the role of Ravan in a Ramlila in the city during Dussehra celebrations, died in #AmritsarTrainAccident, yesterday. His mother (pic 3) says, "I appeal to the govt to provide a job to my daughter-in law. She also has a 8-month old baby." pic.twitter.com/MFDHVhwf4G
— ANI (@ANI) October 20, 2018
दलबीरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दलबीर सिंह हा अनेक वर्षांपासून रामलीलेत रावणाची भूमिका साकारत होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. रावणदहनाच्याच दिवशी दलबीरचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दलबीरच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी काल (शुक्रवारी) रात्री या दुर्दैवी अपघाताबाबत दुःख व्यक्त केले आहे. ‘अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेमुळे अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातातील जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. यासाठी आवश्यक ते सहाय्य त्वरित देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.