अमृतसर । रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्या लोकांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. या भीषण अपघातात ६१ हुन अधिक जणांना मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झाले आहेत. रावणदहनच्या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुराव्यानीशी मिळाली आहे.
#AmritsarTrainAccident: Dussehra committee had written a letter (pic 1) to police seeking security arrangements for Dussehra celebrations at Dhobi Ghat, Golden Avenue in Amritsar. Assistant Sub-Inspector Daljeet Singh reverted (pic 2) that police have no objections in this regard pic.twitter.com/cu7QXbXZV7
— ANI (@ANI) October 20, 2018
या अपघाता जबाबदारी स्वीकारण्यास स्थानिक प्रशासन आणि रेल्वेकडून टाळाटाळ होत असली तरी रावणदहनाच्या कार्यक्रमला परवानगी दिल्यामुळे त्यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभी राहिली आहे. या कार्यक्रमासाठी दसरा समितीने पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीचा विचार करून पोलीस प्रशासनाने आयोजकांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु पोलिसांचा या दसरा कार्यक्रमाबाबत कुठलाही आक्षेप नसल्याचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर दलजीत सिंह यांनी परवानगीच्या पत्रात म्हटले होते.
मात्र कार्यक्रमाला परवानगी देऊनही येथे पोलीस उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठा अपघात घडला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.जालंधरहून अमृतसरकडे ट्रेन येत असतानाच विरुद्ध दिशेनेही दुसरी ट्रेन आली. त्यामुळे रुळांवर उभे असलेल्या बेसावध लोकांना आपला जीव वाचविण्याकरिता वेळ मिळाला नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.