HW News Marathi
देश / विदेश

शिवसेनेला स्वस्तात पेट्रोल देण्याचा उपक्रम भोवला

सिंधुदुर्ग। शिवसेना भवननंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता आणि दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद संपत नाही. तोपर्यन्त पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वादाची ठिणगी पडली. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. भाजप कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळाली होती. त्यानंतर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्तेत्यांनी एकमेकांना डीवचण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा अनर्थ टळला आणि यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार घडला.

या वादानंतर आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल केलेत. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मनाई आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यांची 141, 143, 149, 188,269, 270 या कलमाखाली नोंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! आज संध्याकाळी मोदी सरकारचा विस्तार, ४ मंत्र्यांचे राजीनामे, ४३ नेते मंत्री म्हणून शपथ घेणार!

News Desk

डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना नोबेल पुरस्कार

swarit

विना अनुदानित सिलेंडर ४८ रुपयांनी महागला

News Desk