नांदेड | खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंघ किरट याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने अटक केली आहे.सरबजीतसिंघ किरट हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू संघटनेचे नेते त्यांच्या रडारवर होते.
An alleged Khalistan supporter was arrested on 7th February. Punjab CID had traced his location and informed us. He is being taken to Punjab: Nanded Police#Maharashtra pic.twitter.com/VmM5sCLLA7
— ANI (@ANI) February 9, 2021
सरबजीतसिंघ हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंजाब पोलिसांचे सीआयडी पथक नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिकारघाट परिसरातून दहशतवादी सरबजीतसिंघ याला अटक केली. या प्रकरणी पंजाबच्या अमृतसरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी तिघांना अटक झाली होती. तर एक फरार नांदेडमध्ये लपला होता. अखेर त्यालाही अटक करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.