HW News Marathi
देश / विदेश

एकनाथ खडसे राहुल गांधीच्या भेटीला

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन तसे संकेत दिले. खडसेंसोबत त्यांची सून रक्षा खडसे देखील कॉँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसे यांना कॉँग्रेसमध्ये प्रवेश करायचा असेल तर हायकमांडची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार खडसे राहुल यांना भेटले आहेत. या भेटीदरम्यान, नेमके काय घडले आहे, याचा तपशिल अद्याप समजू शकला नाही. परंतु खडसे भाजपला सोडण्याच्या तयारीत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, राहुल यांना भेटण्यापूर्वी खडसे यांनी नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. परंतु त्यांच्यात कशावर चर्चा झाली, हे समजू शकले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीनगरमधील झिरो पुलावर दशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

News Desk

दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवते विरोधात !

News Desk