ढाका | बांगलादेशामध्ये विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज (२४ फेब्रुवारी) सायंकाळी घडली आहे. चत्तोग्राम येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ढाकाहून दुबईला जाणारे ‘बीजी १४७’ विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपहरण करणाऱ्या व्यक्तीने विमानाीत गोळीबार केला. विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. तसेच, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबारीदरम्यान विमानातील क्रू मेंबर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळली आहे.
Bangladesh: A suspect has been arrested in connection with attempt made to hijack Dhaka-Dubai flight "Biman BG 147" at Shah Amanat International Airport in Chattogram. All passengers safe https://t.co/XNGpoUdfuW
— ANI (@ANI) February 24, 2019
हायजॅकचा प्रयत्न झालेले विमान हे स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५.१५ वाजता चितगांव एअरपोर्टवर उतरले होते. या विमानात बांगलादेशच्या खासदारांसह प्रवासी होते. हे विमान ‘बिमान बांगलादेश एअरलाईन’चे असल्याची माहिती असून यामध्ये एकून किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती पुढे आले नाही. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमान हायजॅक करणाऱ्यात एका बंदूकधारी व्यक्तीचा हात आहे. त्याने पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी बोलण्याची मागणी केली. सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढले असून क्रू मेंबर्सना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.