HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशात भारतीय वायू सेनेचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये भारतीय वायू सेनेचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना आज (२८ जानेवारी) घडली आहे. या घटनेत कोणती जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अद्याप काहीच माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर भारतीय वायू सेनेकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

कुशीनगरमधील हेतिमपूर गावातील शेतात हे विमान कोसळले. हे विमान कोसळण्यापूर्वी पायलटने पॅराशूटच्या मदतीने उडी मारल्याने सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश हवाई दलाच्या मुख्यालयातून देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk

मोदी सरकारकडून मुंबई लोकलसाठी तब्बल ५४ हजार कोटींचा निधी मंजूर

News Desk

टाईम मॅक्झिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश

News Desk