नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तरही देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. देभरात कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. तर १०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारने देखील जनतेला मदतीचे आवाहन केले होते. यानंतर अनेक दिग्गजांनी खुल्या मनाने देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात म्हणून पुढाकार घेतला. कोरोनाशी लढईत आता आंध्र प्रदेशातील एका ४ वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले पैसे राज्य सरकारला दिले आहे.
Andhra Pradesh: A 4-year-old boy Hemanth has donated his savings of Rs 971, with which he wanted to buy a bicycle, to Chief Minister's Relief Fund in Vijayawada. He handed over the money to state minister Perni Venkatramaiah at YSRCP office in Tadepalli. #Coronavirus pic.twitter.com/L1oc3bTGf3
— ANI (@ANI) April 7, 2020
या चिमुकल्याने त्यांच्याकडील ९७१ रुपये हे पैसे आंध्र प्रदेशातील सहाय्यता निधीसाठी दान केले आहे. या मिलाचे नाव हेमंत असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हेमंत हा सायकलसाठी पैसे साठवत होता. परंतु सध्या देश कोरोनासंकटाचा सामना करत आहे. हे हेमंतच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान दिले आहे. विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचं कार्यालय आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.