HW News Marathi
देश / विदेश

आणखी एक कथित सीडी व्हायरल

पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याची आणखी एक कथित सीडी व्हायरल झाली आहे. सोमवारी हार्दिक पटेलची कथित सेक्स सीडी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. गेल्या २४ तासांमध्ये दोन कथित सीडी व्हायरल झाल्यामुळे हार्दीक पटेलची डोकेदुखी चांगलीच वाढताना दिसत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ २२ मे रोजीचा असल्याचं सांगण्यात येतय. या व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिक पटेल असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये त्याचा एक मित्र आणि एक तरुणी असल्याचं दिसत आहे.

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडोमोडींना वेग आलाय. या पुर्वी व्हायरल झालेली सीडी अश्विन सांकडसरिया यांनी समोर आणली होती. मात्र हा व्हिडीयो खोटा असल्याचा दावा हार्दिक पटेल यांनी केला होता. हार्दिक पटेलने व्हायरल झालेली सीडी चुकीची असल्याचं ४ दिवसांमध्ये सिद्ध करुन दाखवावं, असे आव्हान अश्विन सांकडसरिया दिले आहे. ‘हार्दिकच्या सीडीची न्यायवैद्यक चाचणी करण्यात यावी,’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

News Desk

केंद्राची रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख ६० हजार कोटींची मागणी, बँकेचा स्पष्ट नकार

Gauri Tilekar

राजनाथ सिंहांनी केली राफेलची पूजा, भारतीय वायू दलाच्या ताफ्यात

News Desk