HW News Marathi
देश / विदेश

सुनावणीसाठी न्यायालयात जाणाऱ्या सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

उन्नाव | हैदराबादमधील महिला डॉक्टरच्या बलात्काराचे लोट देशभर पसरले असताना, उन्नावमध्ये एका सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. आज (५ डिसेंबर) सकाळच्या सुमारास पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये पीडित तरुणी ९० टक्के भाजली गेली. पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी लखनऊमध्ये हलवण्यात आले. बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे

सविस्तर वृत्त लवकरच…

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे !

News Desk

“निवडणूक आयोग त्याच मेलेल्या हत्तीचे नातेवाईक आहेत”

News Desk

पुण्याच्या हाय एक्सप्लोझीव्ह कारखान्यात वायू गळती

News Desk