HW News Marathi
देश / विदेश

अजून एक बँक घोटाळा, व्यापाऱ्याने ३९० कोटीचा चुना लावला

नवी दिल्ली | पीएनबी बँक घोटाळ्यानंतर आता अजून एका बँकेचा घोटाळा समोर आला आहे. नीरव मोदींनी ११ हजार कोटी तर कोठारी पिता-पुत्रांनी ३६९५ कोटींचा बँकेला चुना लावला. हे दोन्ही प्रकरण ताजे असताना अजून एक बँक घोटाळा उघडकीस आल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत झाला आहे. सीबीआयने या घोटाळ्या प्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेने सहा महिन्यापूर्वी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये कंपनीचे संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह आणि कंपनी द्वारका दास सेठ एसआयजेड इनकॉर्पोरेशन यांची नावे आहेत. द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेतून २००७ ते २०१२ दरम्यान ३९० कोटींचं कर्ज घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विजय माल्याला द्यावी लागणार भारतीय बँकांना भरपाई | ब्रिटन कोर्ट

News Desk

#PulwamaAttack : केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक बैठक सुरु

News Desk

आयोध्या प्रकरणावर २९ ऑक्टोबरपासून सुरु होणार सुणावणी

News Desk
मुंबई

टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल’ कारवाई, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा

News Desk

गणवेश परिधान न केलेल्या तसेच बॅचदेखील नसलेल्या टॅक्सी चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी मनसे स्टाईल धडा शिकवला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी स्वत:च्या फेसबुक आकाऊंटवरदेखील शेअर केला.

‘रिक्षा-टॅक्सी चालकांनी कायद्याच्या चौकटीत राहून रिक्षा- टॅक्सी चालवावी. चालकांनी बिना परवाना, गाड्या चालवून दादागिरी दाखवू नये. जर सामान्य जनतेला तुमचा त्रास झाला तर जागेवरच फैसला केला जाईल.’ असं लिहित त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवड्यातला आहे. एअरपोर्ट परिसरात त्यांनी टॅक्सी चालकावर कारवाई केली आहे. ‘या भागात अनेक टॅक्सी चालकांची मनमानी चालते. हे चालक विनापरवाना या भागात टॅक्सी चालवतात असंही निदर्शनास आलं आहे. कित्येक टॅक्सी चालक गणवेश घालत नाही किंवा त्यांच्याजवळ बिल्लाही नसतो. म्हणून त्याच्याक्षणी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं’

‘जे टॅक्सी, चालक प्रवाशांकडून जास्त भाडे आकारतात त्यांना आम्ही चोप देतो. कारण वाहतूक पोलीस किंवा अधिकारी अशा मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करत नाही. जर त्यांनी कारवाई केली असती तर आम्हाला कायदा हातात घेण्याची गरजच भासली नसती. आम्ही कोणत्याही वर्गाच्या, समाजाच्या विरोधात नाही. पण, कायदे नियम पायदळी तुडवून जर रिक्षा, टॅक्सी चालक मुजोरी करत असतील तर मात्र मनसे स्टाईल धडा त्यांना शिकवण्यात येईल’ अशीही प्रतिक्रीया त्यांनी डीएनएला दिली.

या टॅक्सी चालकाला उठाबशा काढायला लावून नंतर त्याला सोडण्यात आलं. टॅक्सी रिक्षा चालकांवर कारवाई करत त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याची नितीन नांदगावकर यांची ही पहिलीच वेळ नाही याआधीही त्यांनी अनेक रिक्षा/टॅक्सी चालकांना धडा शिकवला होता.

Related posts

मरोळमध्ये माकडांचा उच्छाद, नव्या पाहुण्यांमुळे रहिवाशी झाले त्रस्त

News Desk

लोया प्रकरणाचे सत्य बाहेर कधी येणार | पृथ्वीराज चव्हाण

News Desk

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

News Desk