नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज (३ सप्टेंबर) अमेरिकेची आठ अपाचे- ६४ ई लढाऊ हेलिकॉप्टरचा सामावेश झाला आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची सक्षमता वाढली आहे. पठाणकोट येथील वायू दलाच्या तळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात अपाचे या अत्याधुनिक हेलिकॉप्टरचा भारतीय वायू दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांच्या उपस्थिती हवाई दलात सामाविष्ट करण्यात आले. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसेच शक्तिशाली लढाऊ हेलिकॉप्टर आहे. प्रमुख्याने या लढाऊ हेलिकॉप्टरला उंच डोंगररांगामध्ये वापर केला जातो.
Air Chief Marshal BS Dhanoa: It is one of the most fierce attack helicopters in the world. It is capable of performing many missions, today with the induction of Apache AH-64E, the Indian Air Force has upgraded its inventory to the latest generation of attack helicopters. https://t.co/TdoBZjOuCj pic.twitter.com/yRBR2Uafhr
— ANI (@ANI) September 3, 2019
भारताने २२ अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी अमेरिकेसोबत २०१५मध्ये करार करण्यात आला होता. आतापर्यंत बोईंगने जगभरातील अनेक देशांना २२०० अपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे. हवाई दलात अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करणारा भारत हा १४ वा देश ठरला आहे. अमेरिकेने १९७५ मध्ये या अत्याधुनिक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली. अमेरिकेने लढाऊ हेलिकॉप्टर १९८६मध्ये पहिल्यांदा युद्ध भूमीवर वापरले होते. त्याचप्रमाणे या हेलिकॉप्टरच्या सह्याने अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी वापर करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.