HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : काश्मीरमधून कलम ३७० रद्द, विभाजन विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन विधेयक आज (६ ऑगस्ट) लोकसभेत मंजूर झाले आहे. अखेर लोकसभेत हे विधेयक ३७० विरुद्ध ७० मतांनी मंजूर करण्यात आले.आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही राज्ये अस्तित्वात येण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे काश्मीर ३७० कलम मुक्त करण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले आहे.

अमित शहा यांनी आज सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचे आणि जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचं विधेयक मांडले. या तिन्ही विधेयकांवर सभागृहात चर्चा झाली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी विधेयकांवर अनेक सवाल उपस्थित केले, याला शहा यांनी उत्तरे देखील दिली.

लोकसभेत तांत्रिक पद्धतीने मतदान घेण्यात आले आहे. या विधेयकावर लोकसभेत तीन वेळा मतदान घेण्यता आले. काही तांत्रिक बिघाडमुळे तीन मतदान झाले. या पहिल्या वेळेस झालेल्या मतदानात ३५१ विरुद्ध ७२ मते मिळाले, तर दुसऱ्या मतदानात ३६७ विरुद्ध ७० मते मिळाली आहे. तर शेवटी घेण्यात आलेल्या मतदानात ३७० विरुद्ध ७० मते मिळत अखेर हे विधेयक पास झाले. काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यासा लोकसभेत ३७० मते मिळत विधेयक मंजूर करण्यात आले.

यावेळी अमित शहांनी सामाजिक संकल्प विधेयकावर मतदान घेण्यात आलं. त्याच्या बाजूने ३५१ मते पडली तर विधेयकाच्या विरोधात ७२ मते पडली. एकूण ४२४ सदस्यांनी यावेळी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तर एक खासदार अनुपस्थित राहिला. या सामाजिक संकल्प विधेयकात संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचीही तरतूद आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयकावर मतदान घेण्यात आलं असता मतदानाच्या बाजूने ३६७ आणि विरोधात ६७ मते पडली. यावेळी जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयकही मंजूर करण्यात आलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली ! शरद पवारांच्या ‘त्या’ भर पावसातील सभेची वर्षपूर्ती

News Desk

कार्ती चिदंबरम यांना अटक

swarit

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मृत्यूची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

News Desk